दशावतारांचे पुनरवलोकन
भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, …